#

Advertisement

Thursday, August 25, 2022, August 25, 2022 WIB
Last Updated 2022-08-25T11:01:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नामांतराबाबत मोठी घोषणा....

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नामांतराबाबत विधानसभेत याची घोषणा केली.  उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्यासंदर्भातील ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांच नाव देण्यात यावं, हादेखील ठराव भारत सरकारकडे पाठवण्यात आला असून हा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यासंदर्भात भारत सरकारच्या गृहविभागाला शिफारस करण्यास आली. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामांतरा संदर्भात ठराव मांडला.  नामांतराची प्रक्रिया मोठी असते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं जात आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे नामकरण करण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडे पाठवला.