#

Advertisement

Friday, August 12, 2022, August 12, 2022 WIB
Last Updated 2022-08-12T11:06:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सध्या एकजण महाराष्ट्रात आराेप करत फिरतोय !

Advertisement

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता शिवेसना नेते दीपक केसरकर यांनी टीका केली. सध्या एकजण महाराष्ट्रात आमच्यावर आराेप करत फिरतात. परंतु त्यांनी कार्यर्त्यांच्या भावना अद्याप जाणलेल्या नाही. महाराष्ट्राचे प्रेम रक्तात असावे लागते. रक्ताचा वाटा केवळ राजकीय वाटा असता कामा नये, या शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनता असून केवळ काम करुन दाखवू शकताे. संभाजीराजे, उदयनराजे यांना भेटल्यावर त्यांचे विचार लाेकांना राेजगार उपलब्ध करुन देण्यासाठी झटत असल्याचे जाणवते. शिवसेना म्हणजे कार्यरत असलेले सैनिक…जाेपर्यंत सेना साेबत नाही तर त्याला शिवसेना कसे म्हणणार. आमच्यासाेबत कार्यकर्त्यांची फळी असून ती विचारपूर्वक उभारली गेली आहे. आम्हास किमान एक वर्ष काम करण्याची संधी द्या.