#

Advertisement

Monday, August 8, 2022, August 08, 2022 WIB
Last Updated 2022-08-08T11:50:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मी कसा अजित पवारांच्या नियुक्तीवर नाराज होऊ?

Advertisement

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांना विरोधी पक्षनेते पद दिलं गेल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती, पण या सगळ्या बातम्या जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच कसा अजित पवारांच्या नियुक्तीवर नाराज होऊ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे.
जयंत पाटील हे राष्ट्रवादीमधल्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सत्तेत असताना जयंत पाटील यांनी गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळली. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेतेही आहेत. जयंत पाटील यांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं नाही. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोनदा फोन करून 53 पैकी 36 आमदारांनी स्वाक्षरी करून अजित पवारांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, अशी आठवण करून दिली,