Advertisement
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनंतरही राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर मुहूर्त मिळाला असून यात गृहमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधीपक्षनेते अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार असेल तर आम्हाला निमंत्रण आलं नाही, विस्ताराची शक्यता असेल मात्र, अधिकृत निमंत्रणाचं पत्र आम्हाला मिळालं नाहीय, राजशिष्टाचारप्रमाणे विरोधीपक्षाला सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार व शपथविधिला निमंत्रण दिलं जातं. मात्र आम्हाला निमंत्रणच दिलं गेलं नाहीय, असं विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळं पुन्हा उद्या मंत्रिमंडळ होणार की, लांबणीवर जाणार याची चर्चा सुरु आहे.
