Advertisement
मुंबई : आपली ताकत वाढली आहे. या ताकदीने नाशिकमध्ये 1 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंद झाली पाहिजे. माझा भरवसा तुमच्यावर आहेत. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरे कुणीही नाही. त्यांनी ( एकनाथ शिंदे गट) सदस्य नोंदणीसाठी प्रोफेशनल एजेंट लावले आहेत. सदस्य संख्या ते जेवढी करत आहेत त्याच्या दसपटीने मला हवी आहे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडे केली आहे. केवळ गर्दी,फोटो नको. फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. त्यामुळे ते आपल्याला घरी परत पाठवून देतील. त्यांच्या एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला सदस्यांची संख्या ही दसपटीने जास्त असायला हवी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 'मी कोणालाही कमी लेखत नाही. आपल्याला जिंकायचे आहे. मर्दासारखे जिंकायचे आहे. प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल. शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकू देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला त्याला दाखवून द्या, असा आदेशही उद्धव ठाकरेंनी दिला.
