#

Advertisement

Wednesday, August 31, 2022, August 31, 2022 WIB
Last Updated 2022-08-31T17:56:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

धनंजय मुंडेंचा शायरीतून पलटवार !

Advertisement


परळी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंवर करुणा शर्मा  यांच्यावरून अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टोलेबाजीला धनंजय मुंडे यांनी परळीत नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातून अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं. राहत इंदोरी यांचा एक शेर धनंजय मुंडे यांनी म्हंटल. माझ्यावर राजकीय, कोव्हिड अशी अनेक संकटं आले, पण तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मी जगात कोणालाच भित नाही, असं मुंडे म्हणाले.
राह में ख़तरे भी हैं लेकिन ठहरता कौन है, मौत कल आती है आज आ जाये डरता कौन है ! तेरी लश्कर के मुक़ाबिल मैं अकेला हूँ मगर, फ़ैसला मैदान में होगा कि मरता कौन है !! असं म्हणत धनंजय मुंडे यांनी फटकेबाजी केली. 
ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लगावला होता.