Advertisement
सिल्लोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात गणरायाचे थाटात आगमन झालं आहे. सिल्लोड शहरातील सगळ्या गणेश मंडळांनी वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले. युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हातात भगवा झेंडा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव घरातच साध्या वातावरणात साजरा करावा लागला. सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता आहे, असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
