Advertisement
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत शपथविधी पार पडला. त्यानंतर भाजपाच्या नऊ आणि शिंदे गटातील नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. भाजपाच्या नऊ आमदारांमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढांनी सुद्धा शपथ घेतली. दरम्यान, त्यांना गृहनिर्माण खातं मिळणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मंगलप्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर लोढांनी राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीमागचं कारण कळलं नाही, मात्र सदिच्छ भेट असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं असून, मुंबई पालिका निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
