Advertisement
पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या, असं यामध्ये म्हणण्यात आलं आहे. प्रत्येक वेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे 2024 ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी पत्रात दिलं आहे.
तुम्ही फडणवीस यांची संसदीय बोर्डात जी निवड केली आहे ती अतिशय सार्थ असून दिल्लीतल्या राजकारणाची फडणीस यांची सुरुवात पुण्यातून हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना हे पत्र पाठवलं आहे. मात्र, ही मागणी भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार की नाही, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
