Advertisement
मुंबई : सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे, राज्यातील पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होत आहे, १७ ऑगस्टपासून ते २५ ऑगस्टपर्यंत हे पावसाळी अधिवेशन असणार आहे, त्यामुळं या अधिवेशनात कोणकोणते मुद्दे उपस्थित करायचे तसेच सत्ताधाऱ्यांना कोडींत कसे पकडायचे आदीबाबत ही बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे, या सरकारचे हे अधिवेशन पहिलेच आहे. तसेच महाविकास आघाडीतील विधानपरिषद विरोधीपक्षनेते हे पद शिवसेनेकडे गेले आहे, त्यामुळं काँग्रेसलान विचारताच शिवसेनेनं हा निर्णय घेतल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर पसरला आहे, यावर सुद्धा खलबतं होण्याची शक्यता आहे, तसेच महाविकास आघाडीची आगामी रणनिती यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे, या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.
