Advertisement
नवी दिल्ली : शिवसेनेवरच्या शिंदेंच्या दाव्याचा वाद निवडणूक आयोगाकडे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दोन आठवड्यांमध्ये कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत मागितली होती, पण ही मुदत निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ठाकरे गटाला आता 23 ऑगस्टपर्यंत कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने दाखल केलेल्या तक्रारीवरही आक्षेप घेण्यात आले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणताही मोठा निर्णय घेण्यात येऊ नये, असं सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गट यांना त्यांच्याकडची कागदपत्र सादर करायला 8 ऑगस्टपर्यंतची वेळ दिली होती. पण, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करायला चार आठवड्यांचा वेळ मागितला होता.
