Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या दोघांमध्ये झालेली आणि माध्यमांसमोर आलेली ही दुसरी भेट आहे. याआधी फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे रात्री उशीरा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले होते. देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं मुंडे यांनी सांगितलं होतं.
आता पुन्हा एकदा फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. गोगल गाईमुळे 10 हजार हेक्टर जमिनीतील पीकं खराब झाली आहेत. काल जो निर्णय घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही. गोगल गाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. आतापर्यंत पंचनामेही झाले नाहीत. आपण तात्काळ पंचनामे करावेत, असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.
