#

Advertisement

Friday, August 26, 2022, August 26, 2022 WIB
Last Updated 2022-08-26T12:19:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंनी केली या पक्षासोबत युती

Advertisement

मुंबई : संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली.
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोकशाही धोक्यात आलेली असताना छोटे पक्ष, संघटना वाचवायच्या असतील तर एकत्र यावं लागेल, यावर आमचं एकमत झालं. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,  महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे.  आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.