Advertisement
सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या 102व्या जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात झाला. सोलापुरात आयोजित केलेल्या
भव्यदिव्य मिरवणुकीत बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो युवकांनी हजेरी
लावली. बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य व विशाल खंदारे मित्र परिवार यांच्या
वतीने या मिरवणूक साहेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये सहभाग नोंदवत
माजी मंत्री "शब्दप्रभु' लक्ष्मणराव ढोबळे यांनी मनमोकळेपणाने उत्सवाचा आनंद लुटला.
त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
"संयुक्त महाराष्ट्र'च्या लढ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा सहभाग होता.
मराठी साहित्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांनी मोठी साहित्यसंपदा गेली आहे, त्यांना
शाहीर, साहित्यरत्न म्हणून ओळखले जाते. या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील
अनेक पदाधिकारी, मान्यवरांचे आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले. लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे जयंती मिरवणुकीत सहभाग घेत अनेकांनी हलगीच्या तालावर ताल धरला. यातून जयंतीचा
उत्साह दुणावत गेला. सोलापूर शहरातून उत्साही वातावरणात मिरवणूक पुढे निघत असताना
वातावरण उत्साही होत होते.
यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मंडळांचा व
पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच "विशाल खंदारे मित्र परिवार'च्यावतीने बहुजन रयत परिषद
महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे व माजी मंत्री उत्तमप्रकाश
खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशनाचा सोहळाही पार
पडला. या कार्यक्रमास दलित स्वंय संघाचे महाराष्ट्र संघ प्रमुख विजयकुमार पोटफोडे,
माजी नगरसेविका स्वातीताई आवळे, निवृत्त पोलीस अधिकारी उकरंडे, राजू क्षीरसागर
यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू
भाऊ कसबे, पंढरपूरचे माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक महेश साठे,
कुर्डूवाडीचे माजी नगरसेवक किसनराव हनवते, पुणे येथील बहुजन वंचित आघाडी युवा
प्रदेशाध्यक्ष सागर भाऊ जाधव मित्र परिवार, लहुजी शक्ती सेना पुणे शहर अध्यक्ष सनी
साळवे व मिरवणुकीमध्ये सहभागी मंडाळांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण सैराट फेम केम येथील 25 जणांचा हलगी ग्रुप ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक खंदारे, विशाल उघडे, अमित
तांबे, तेजस तांबे, राजू भिसे, सोमनाथ बनसोडे, प्रेम सर्वगोड यांच्यासह पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




