Advertisement
सोलापूर : निवृत्त गटविकास अधिकारी वैजनाथ साबळे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले तर मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ होते त्यांच्या पश्चात मुख्याध्यापिका पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सोमवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्याने सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वैजनाथ साबळे हे उत्तर सोलापूर पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी होते. त्यानंतर प्रमोशन होऊन ते एकात्मिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी झाले. त्यानंतर प्रमोशन होऊन मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी झाले पुढे अक्कलकोट गटविकास अधिकारी पदावर काम केल्यानंतर ते निवृत्त झाले होते. उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांचे ते चांगले मित्र होते. कायम त्यांच्या संपर्कात असल्याने साबळे यांच्या मृत्यूनंतर ‘दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस हरपला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
