Advertisement
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणामुळे आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पण, आता महिलेला शिवीगाळ केल्या प्रकरणी राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. शिवीगाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांचा नव्याने जबाब नोंदवला जाणार आहे. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणात संजय राऊत आता पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू केला आहे. आज स्वप्ना पाटकर यांचा पुन्हा नव्यानं जबाब नोंदवला जाणार आहे. वाकोला पोलीस ठाण्यात स्वप्ना पाटकर दाखल झाल्या आहेत. वरीष्ठ अधिकारी, या प्रकरणी चौकशी करू शकतात, त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत.
