Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एसी लोकलच्या मुद्द्यावरून आज रेल्वेच्या जीएम यांची भेट घेतली आणि त्यांना काही पर्याय सुचवले. लोकांना त्यांच्या सध्या लोकल हव्या आहेत, त्यांना त्या देवून अतिरिक्त एसी लोकल देण्यात याव्यात, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी जीएमना भेटल्यानंतर केली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये यावर तोडगा काढू, असं आश्वासन जीएम यांनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
मुंबईतल्या सर्व लोकल 5 डब्यांच्या करण्यात याव्यात अशीही आमची मागणी आहे. एसी लोकलचा प्रश्न लवकर सोडवला जाईल, असं त्यांनी सांगितलं, पण तसं झालं नाही तर आम्ही जनतेच्या सोबत आंदोलन करू, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला.
