#

Advertisement

Saturday, August 27, 2022, August 27, 2022 WIB
Last Updated 2022-08-27T11:43:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई-पुणे महामार्गावर आजच्या दिवसासाठी टोलमाफी

Advertisement

मुंबई  : मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती टोलमाफीची घोषणा केली आहे. वाहतूक कोडींची समस्या सुटावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे. या आदेशानुसार ही टोलमाफी आजच्या दिवसासाठी असणार आहे.
राज्यात सर्वत्र सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक आपल्या गावी जात आहेत. अनेक प्रवासी आज पुण्याच्या दिशेला जात आहेत. याशिवाय आज शनिवार आहे. शनिवार हा शक्यतो सुट्टीचा वार असतो. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. काहीजण आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याशिवाय कोकणात गणेशोत्सवास जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर वाढलेली गर्दी, यात टोल नाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रागा लागणे , काही टोल नाक्यावर फास्टटॅग चालत नाही. तर काही ठिकाणी पैसे देण्यात वेळ जाणे त्यामुळे वाहतूक कोंडी वाढू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुन आजच्या दिवस मुंबई-पुणे महामार्गावर टोलमाफी करण्यात आली आहे.