#

Advertisement

Tuesday, August 16, 2022, August 16, 2022 WIB
Last Updated 2022-08-16T11:32:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शाहू शिक्षण संस्थेच्या सोलापूर, पंढरपुरातील महाविद्यालयात स्वातंत्र्य महोत्सव साजरा

Advertisement

 


सोलापूर/पंढरपूर : शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानज्योती मराठी विद्यालय, वस्ताद लहुजी साळवे मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वसुंधरा महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्वातंत्र्याचा 75वा अमृतमहोत्सव शाहू संकुल, सोलापूर येथे अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
पहाटे 3.00 वाजता चार पुतळा चौकात प्राचार्य चिदानंद माळी, प्राचार्य अंबादास पांढरे, साई गुंटुक, श्रद्धा गुंटुक, साईश्रध्दाचे आईवडील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशालेतील साईश्वर गुंटूक व श्रद्धा गुंटूक यांची चार हुतात्मा पुतळा, पार्क चौक येथून निघालेल्या तिरंगा दौडीचे स्वागत शाहू संकुलात प्रशालेचे प्राचार्य चिदानंद माळी, ज्ञानज्योती मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. जनार्दन चव्हाण, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना गायकवाड त्याचबरोबर दत्तात्रेय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी केले.
स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मिनाताई गायकवाड यांच्या हस्ते तर प्राचार्य माळी सर मुख्याध्यापक चव्हाण, दत्तात्रेय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्ञानज्योती मराठी विद्यालय, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वस्ताद लहूजी साळवे वसतीगृह, वसुंधरा महाविद्यालय येथील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
वसुंधरा महाविद्यालयाचे प्रा. मोगले यांनी सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीबद्दलची शपथ दिली. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शाहू संकुलाच्या चारही युनिटच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसुंधरा महाविद्यालय, ज्ञानज्योती मराठी विद्यालय, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर गाणे, मानवी मनोऱ्याचे आयोजन अतिशय बहारदार पद्धतीने करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी सुलक्षणा महारुद्रय्या स्वामी हिने भारतमाता छान साकारली होती.
वस्ताद लहूजी साळवे वसतीगृहाच्या मावशी श्रीमती सिद्धम्मा जिंगेकर यांचाही सह्यद्य सत्कार प्राचार्य चिदानंद माळी, दत्तात्रेय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वसुंधरा महाविद्यालयाचा विद्यार्थी सोमनाथ धुळे या विद्यार्थ्याला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचा "राजर्षी शाहू गुणवंत विद्यार्थी' पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य माळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
प्रशालेच्या भव्य मैदानात भारताच्या नकाशाची भव्य प्रतिकृती तयार करुन विद्यार्थी साखळीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. हा नकाशा तयार करण्याकामी क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण कोळी, सिध्दाराम बिराजदार, बसू गडदे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन तिन्ही युनिटमधील सांस्कृतिक विभाग, क्रिडा विभाग यांनी अतिशय नेटकेपणाने केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण कोळी, "ज्ञानज्योती'च्या सहशिक्षिका लोंढे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद प्रशालेच्या सहशिक्षिका उर्मिला देडे, सौ. मिनाक्षी मेडपल्ली, सौ. सरिता वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक सहशिक्षक ब्रम्हदेव यांनी केले. सहशिक्षक राज खरात यांनी आभार मानले.