Advertisement
नाशिक : शाहू शिक्षण संस्था नाशिक शाखा बहिणाबाई बी.एड कॉलेज.कुसुमाग्रज ज्युनियर कॉलेज .कुसुमाग्रज प्राथमिक आणि माध्यमिक विद्यामंदिर तसेच डॉल्फिन पूर्व प्राथमिक विद्या मंदिर नाशिक शाखेत आज 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक नवनाथ कांदे हे उपस्थित होते, त्यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले .तसेच बी .एड च्या. प्राचार्या पाटील मॅडम,ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य केसरे सर, कुसुमाग्रज प्राथमिक आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, डॉल्फिन पूर्व प्राथमिक च्या मुख्या ध्यापिका हिरोडकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते . सुरुवातीला इ 8 वी आणि 9 वी च्या विद्यार्थिनीनी संदेशे आते है हे गाणे लेझिम नृत्यावर अतिशय सुदंर सादर केले. तसेच इ 1 ली ते.9वी च्या विद्यार्थ्यांनी देशावर आधरित गीतावर सुंदर असे नृत्य,भाषणे, समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव मॅडम यांनी केले . रोशनी पाटील आणि अमृता मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच प्राचार्य पाटील मॅडम आणि केसरे सर यांनी अमृत महोत्सवी भाषणातून विद्यार्थ्याना प्रेरणारुपी संदेश दिला.शेवटी प्रमुख अतिथी यांनी आपले सैनिकी कार्य तसेच भारतीय स्वतंत्र चळवळ यावर मनोगत व्यक्त केल. ठोके मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
