Advertisement
मुुंबई : देशात सर्वसामान्य नागरिक महागाईने वैतागून गेला आहे. कमाई, उत्पन्न महागाईपुढे तोकडे पडत आहे. महागाई दर जवळपास 7 टक्क्यांवर पोहचला आहे. पण राज्यांमधील महागाईचा दर वेगवेगळा आहे. काही राज्यांत महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईने देशाच्या महागाई दराला ही मागे टाकले आहे. तर काही राज्यातील महागाई दर अगदी नगण्या आहे. तो देशाच्या महागाई दराशी व्यस्त प्रमाणात आहे.
देशात सर्वाधिक महागाई तेलंगाणा राज्यात आहे. 8.32 टक्के महागाई दर आहे. हा दर देशाच्या महागाई दरापेक्षा अधिक आहे. देशातील 14 राज्यात महागाई दर जास्त आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, 8.06 टक्के तर सिक्किममध्ये 8.01 टक्के महागाई आहे. त्यानंतर अनेक राज्यांचा क्रमांक लागतो.
आपला महाराष्ट्र कुठे आहे?
महागाईत महाराष्ट्रही अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा राज्यातील इंधनाचे दर जास्त आहे. वीज दरातही वाढ करण्यात आली आहे. भाजीपाला, मसाले, अन्नधान्य, खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना कुठेच दिलासा मिळालेला नाही. महाराष्ट्रात महागाईचा दर 7.7 टक्के आहे. देशाच्या महागाई दरापेक्षा अर्थातच राज्याचा महागाई दर जास्त आहे. पण इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात महागाई कमी आहे. मध्यप्रदेशमध्ये महागाई 7.52, आसाममध्ये 7.37, उत्तर प्रदेशात 7.27, गुजरातमद्ये 7.2, जम्मू-काश्मीरमध्ये 7.2 तर राजस्थानमध्ये 7.1 टक्के महागाई आहे.
