Advertisement
मुंबई : आता तुम्हाला बोलणाचा, टीका करण्याचा अधिकार नाही. आता आपण गप्प बसावे, रिटायरमेन्ट मिळालेली आहे, आता घरी बसा, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्धा तुमची लायकी नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर त्याच शब्दांत नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री नसून परमनंट मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे-फडणवीस सरकारही परमनंट आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.गणपती बाप्पाने कंत्राटी सरकार आधीच घालवून लावले, अशा शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारे अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले नव्हते, असंही ते म्हणाले.उद्धव ठाकरे हे फक्त तीन तास मंत्रालयात गेले. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला त्यांनी काय दिले, असा प्रश्नही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. | |||
