Advertisement
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्र्यांवर प्रचंड भार आलाय, त्यामुळे ते आजारी पडले आहेत. हाच भार सगळ्यांमध्ये वाटला तर ताण कमी होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.
काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. काय निकाल लागतोय म्हणून विस्तार करत नाहीत का, अशी शंका आहे. यांनी 40 लोकांना मंत्री करतो, असं सांगितलं का? भाजपच्या काहींचे चेहरे इतके पडले आहेत की काही बोलायला नको. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार पाहत आहेत. राज्यातली विकासकामं खोळंबली आहेत. सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, तर फडणवीसांकडे कोणतंही खातं नाही,' असही अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली, महिन्याभरात मंत्रिमंडळ विस्तार नाही, खातेवाटप नाही. अतिवृष्टीने नुकसान झालं आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री आणणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. कृतीतून लोकांना मदत करा, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
