Advertisement
मुंबई : शिवसेना कुणाची हा प्रश्न कायम आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले. याबाबत त्यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. यात कोणत्या पक्षाला किती यश मिळालं याची आकडेवारी त्यांनी दिली. यात त्यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे.
एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हटलं की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.
