Advertisement
पुणे : शिवसेना माझीच, असे मी म्हणायला पाहिजे, असे भाजप नेते उदयनराजे भोसले म्हणाले. शिवसेना-भाजप सरकार आहे, असे उदयनराजे म्हणाल्यावर शिवसेना कोणाची, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, कोणाची म्हणजे काय? आता शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाली, मग काय मी म्हणायचे का शिवसेना माझी आहे. मग माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्रसुद्धा माझाच म्हटला पाहिजे. पण महाराष्ट्र हा लोकांचा आहे, लोकांमधून, जनतेतून आम्ही निवडून येतो. छत्रपतींचा महाराष्ट्र हा जनतेचा आहे, असेही ते म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची भेट घेतली. शिवसेनेतल्या बंडाविषयी विचारले असता शिवसेनेत बंड झाले का, मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.
