Advertisement
मुंबई : मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. ओबीसी आरक्षणामुळं पालिका निवडणूक लांबणीवर गेली आहे. पण पुढील दोन ते तीन महिन्यात मुंबई पालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळं सर्वंच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर मागील अनेक वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेच्या झेंडा आहे, यामुळं पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तसेच ही निवडणूक शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची तसेच अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळं पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कंबर कसली असून, शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे.
