Advertisement
| लामजना : बहुजन रयत परिषदेचे
संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी
राज्याचा दौरा करीत आहे. त्यानुसार महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे
यांनी लामजना ग्रामपंचायतीस भेट देऊन तेथील शासकीय कर्मचारी तसेच बहुजन रयत
परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी लामजना ग्रामपंचायतीमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 102वी जयंती निमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य तसेच उपेक्षितांसाठीचे कार्य याबाबत त्यांनी काही मुद्दे विषद केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लामजना गावचे उपसरपंच बालाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नजीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य राम कांबळे यांच्यासह लातूर बहुजन रयत परिषदेचे शाखाध्यक्ष तानाजी कांबळे, शाखा सचिव संदेश रोंगे, संघटक निलेश गायकवाड, कार्याध्यक्ष बालाजी गायकवाड, रोहित सुरवसे, लक्ष्मण गायकवाड, गोविंद रोंगे, अमर जेवणजेट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते | |||
