Advertisement
औरंगाबाद : टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे वादात अडकलेले शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची चिन्ह आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची नाव आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांच्या मुलांची नाव टीईटी परीक्षेच्या लाभार्थीच्या यादीत असल्याचे समोर आले होते. मात्र, तरीही शिंदे सरकारने सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले आहे. आज अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची नाव आहे. या प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात टीईटी घोटाळ्याचा विषय बारकाईने मांडला होता. त्यावर चौकशा सुरू झाल्या आहेत. पण ती चौकशीही संशयास्पद दिसत आहे. सरकार उघडया डोळ्यांने का बघतंय. टीईटी घोटाळ्यात मंत्री आहेत की नाही हे तपासावे, तोपर्यंत मंत्री पदावर त्यांना ठेऊ नये, अशी मागणीच दानवे यांनी केली.
