Advertisement
मुंबई : 'मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, प्रदुषण कमी होईल. आता राजकीय प्रदुषण पण आता बंद झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच कार्यक्रम पार पडला. वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. युतीचे सरकार येऊन दोन महिने झाले आहेत. गेले अडीच वर्षे काय होते यांत मी आता जात नाही. त्याआधीच्या पाच वर्षे या मेट्रोचे काम प्रगतीपथावर होते. उद्या विघ्नहर्ताचे आगमन होत आहे. त्यामुळे राज्यावरील विघ्न सुद्धा दुरू होणार आहे. या मेट्रोमुळे अनेक गाड्यांचं इंधन वाचणार आहे. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, प्रदुषण कमी होईल. आता राजकीय प्रदुषण पण आता बंद झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
