Advertisement
पुणे : मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर काय लक्ष ठेवायचं आहे ते ठेवा आणि काय पाडायचं ते पाडा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा पडायचा विक्रम माझ्या नावावर आहे, असं बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.
चंद्रकांत खैरे यांनी नुकताच दावा केला होता, की शिंदे गटातील 15-16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावरही शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की चंद्रकांत खैरे काहीही फेकाफेकी करतात. 10 आमदार की 15 तेच अजून नक्की नाही, आधी ते करावं आणि मग सांगा म्हणावं, असा टोला पाटील यांनी लगावला. दसरा मेळाव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की दसरा मेळावा एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावा अशी आमची मागणी आहे. कारण आमची शिवसेना खरी आहे.
