#

Advertisement

Thursday, August 18, 2022, August 18, 2022 WIB
Last Updated 2022-08-18T11:07:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आणखी एक बेवारस बोट आढळली....

Advertisement

रायगड : हरिहरेश्वरमध्ये  शस्त्राने भरलेली बोट आढळली. ही घटना ताजी असताना श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ आणखी एक बेवारस स्थितीत फुगा बोट आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले, असा संशय व्यक्त केला जात आहे. 
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ बोर्ली सागरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेवारस स्थितीत आणखी एक फुगा बोट संशयस्पदरित्या आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले, असा संशय व्यक्त केला जात आहे. हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या याच बोटीमधील प्रवाशी हे अन्य एका फुगा बोटमधून प्रवास करत दिवे आगार जवळील किनाऱ्यालगत उतरून पळून गेले अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे