Advertisement
जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाचा वाद हा न्यायालयात पोहोचला होता. दरम्यान आज न्यायालयाने निर्णय दिल्याने एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध ठरवले असून, ते बरखास्त झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.
जळगाव जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहोचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळाचे अधिकार काढण्यात आले होते तसेच संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी केले होते.
