#

Advertisement

Monday, August 29, 2022, August 29, 2022 WIB
Last Updated 2022-08-29T12:47:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संदिपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

Advertisement


औरंगाबाद : शिंदे गटातील बंडखोर नेते संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकामी असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओनंतर ठाकरे गटातील नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांवरुन नागरिकांनी बंडखोरीमुळे त्यांच्याकडे पाठ फिरवल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पैठण शहरात आलेल्या संदीपान भुमरे यांच्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे. संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अवघे 100 ते 150 लोकांची उपस्थिती होती. पैठणमध्ये एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संदीपान भुमरे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र या  कार्यक्रमातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात मात्र नागरिकांची तुफान गर्दी जमा होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.