Advertisement
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला ठाण्यामध्ये दौरा केला. यावेळी शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली. त्यासोबतच ईडी, सीबीआय आणि आमदारांच्या घोडेबाजारावरून भाजपवर जोरदार टीका केली. अशातच शरद पवार यांनी याआधीही महाराष्ट्र पिंजुन काढला आहे, पण त्याचे आमदार कधी ते ६० च्यावर गेले नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लगावला आहे.
बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. मनसे आणि भाजपचं वैचारिक साम्य आहे, महाराष्ट्राचं आणि हिंदुत्त्वाचं रक्षण करण्यासाठी जे नेतृत्त्व राज्यात असेल त्यांना भेटण्यात काही अडचण नाही आणि आमचे परिवारिक संबंध असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना महत्त्व आलं आहे.
