#

Advertisement

Wednesday, August 31, 2022, August 31, 2022 WIB
Last Updated 2022-08-31T12:42:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सोनिया गांधींच्या आईचं निधन

Advertisement

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचं शनिवार 27 ऑगस्टला निधन झालं आहे. काल म्हणजेच 30 तारखेला पाओला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमधल्या त्यांच्या घरी पाओला माईनो यांनी अखेरचा श्वास घेतला. 
सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी बरेच वेळा त्यांच्या उपचारासाठी इटलीलाही जात होते. मागच्याच आठवड्यात सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या. मागच्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अनेक वेळा इटलीला गेले होते. 2020 साली राहुल गांधींच्या वारंवारच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती, तेव्हा काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. राहुल गांधी इटलीला त्यांच्या आजारी आजीला भेटायला जात असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.