#

Advertisement

Wednesday, August 10, 2022, August 10, 2022 WIB
Last Updated 2022-08-10T12:17:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरे बेसावध राहिले?

Advertisement


बारामती : महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाला दोन महिने होत नाहीत तोच बिहारमध्येही सत्ताबदल झाला आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती केली. कालच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि तेजस्वी यादवआणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्र आणि बिहारमध्ये झालेल्या या सत्तांतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी भूमिका मांडली. भाजप निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युती करते, पण निवडणुकीत मित्रपक्षांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी ते घेतात. पंजाबमध्ये अकाली दलसारखा पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेनेत दुरी कशी येईल, अशी परिस्थिती निर्माण केली आणि सेनेवर आघात केला, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रानंतर शरद पवारांनी बिहारचं उदाहरण दिलं. मित्रपक्षांच्या जागा कमी कशा येतील, याची काळजी भाजप घेतं. महाराष्ट्रातही तेच झालं, बिहारमध्येही तेच झालं, पण नितीश कुमार वेळीच सावध झाले, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.