Advertisement
सोलापूर : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाीत तब्बल चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी अवैध दारू साठा विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 14 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या टॅगो कंपनीच्या सुमारे दोन हजार दारूच्या बाटल्या (२१० बॅक्स) जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांच्या कारवाईचं नागरिकांकडून कोतुक होत आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपकडून प्रत्येक आमदाराला 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे '50 खोके, एकदम ओके', असं शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्यासाठी एक ब्रीदवाक्यच विरोधकांचं झालं आहे. बैलपोळ्याच्या दिवशी हे ब्रीद वाक्य अनेक शेतकऱ्यांनी बैलांवर लिहिलं होतं. त्यामुळे खोके हा शब्द आणि शिंदे गट यांचा वारंवार संबध जोडला जातोय. आता देखील सांगोल्यात दारुचे अनेक अवैध भरलेलेल खोके सापडले आहेत. त्यामुळे शहाजी बापूंच्या सांगोल्यात सापडले दारूचे खोके, पोलिसांची कारवाई एकदम ओक्के, अशी चर्चा सुरु झाली आहे.
