#

Advertisement

Tuesday, September 20, 2022, September 20, 2022 WIB
Last Updated 2022-09-20T11:59:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नारायण राणेंना 10 लाखांचा दंड : अनधिकृत बंगला पाडणार ?

Advertisement

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने "अधिश बंगला" बांधकाम अनधिकृत केल्याचा ठपका ठेवत 10 लाखांचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे. बंगल्याबाबत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. 
मुंबईतील जुहू इथं नारायण राणे यांचा "अधिश बंगला"  आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटीस विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. कोर्टाने अंतिम निर्णय देत राणेंना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. अवैध बांधकाम तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोर्टाने सांगितले की नारायण राणे यांनी समुद्रकिनारी तिप्पट बांधकाम केले आहे.  त्यांच्या वकिलांनी कारवाई करण्यास  स्टे मागितला तर तो ही नाकारली आहे. त्यांच्यावर १० लाखाचा दंड ही ठोठावला आहे.