#

Advertisement

Tuesday, September 20, 2022, September 20, 2022 WIB
Last Updated 2022-09-20T11:53:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दिल्लीत "महाराष्ट्र सदना"मध्ये 40 रूम्स बूक !

Advertisement

मुंबई :  राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीचे सत्र सुरू झाले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे हे आपल्यासोब 40 आमदारांनीही घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत. 
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. महाराष्ट्र सदनातील बॅक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम बुक  करण्यात आल्या आहेत. जवळपास 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती आहे. विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.