Advertisement
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात "पेड' दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यानंतरही जिल्हाधिकारी या निर्णयावर ठाम आहेत. देवीच्या दारात गरीब श्रीमंत भेद यामुळे निर्माण होईल त्यामुळे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात "पेड" दर्शनाचा निर्णय घेण्यात आलाय. 200 रुपये आकारून तासाला एक हजार लोकांना दर्शन देण्यात येणार आहे, मात्र देवीच्या दारात दर्शनाचा बाजार व्हायला नको आणि गरीब आणि श्रीमंत भेद नको म्हणून याला विरोध होत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी राहुल रेखावार मात्र या निर्णयावर ठाम असून भाविकांच्या सोयीसाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाविकांनीही देवस्थान समितीच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तास न तास प्रवास करून दर्शन रांगेसाठी आम्ही उभे राहतो, मात्र "पेड"पास घेऊन काही जण थेट मंदिरात जात आसतील, तर हे चुकीचे असल्याच भाविकांचे म्हणणे आहे.
