#

Advertisement

Tuesday, September 20, 2022, September 20, 2022 WIB
Last Updated 2022-09-20T11:42:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दसरा मेळावा? मुंबई पालिकेन निर्णय ढकला पुढे !

Advertisement

मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटानेही दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र,  दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. 22 तारखेपर्यंत मुंबई पालिका दोन्ही गटांच्या अर्जांना उत्तर देऊ शकेल. दसरा मेळावा कोण घेणार या मुद्द्यावरुन होणारं राजकारण आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार आहे. शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडले जात आहे