#

Advertisement

Friday, September 16, 2022, September 16, 2022 WIB
Last Updated 2022-09-16T18:20:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांच्या 'टीम राष्ट्रवादी'ची घोषणा !

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं 10 आणि 11 सप्टेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पक्षातली कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले, त्यानंतर शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांना प्रमोशन मिळालं आहे, जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. तर नवाब मलिक यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं आहे. मलिक आणि आव्हाड हे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल तर मुख्य जनरल सेक्रेटरीपदी सुनिल तटकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे यांना घेण्यात आलं आहे.