#

Advertisement

Friday, September 16, 2022, September 16, 2022 WIB
Last Updated 2022-09-16T13:06:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार

Advertisement

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. आता गुरुवारी झालेल्या बैठकीतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथेच करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. याआधी महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी या सफारीची योजना करण्यात आली आहे.