Advertisement
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या याबाबत चांगलीच चर्चाही सुरू आहे. सुशील कुमार शिंदे, नाना पटोले आणि मुकुल वासनिक यांच्या नावावर सोनिया गांधी यांनी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या चर्चांना आता नाना पटोले यांनी पूर्णविराम दिला आहे.
शील कुमार शिंदे आणि मुकुल वासनिक सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तर नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या नावाची चर्चा असल्याचं समोर येत होतं. एकीकडे राहुल गांधींवर नाराजी आणि काँग्रेसच्या बदलत्या धोरणांनंतर गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला. काँग्रेसमधील अंतर्गत वादही समोर येत असताना आता ही मोठी चर्चा सुरू झाली. या दरम्यान महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नावांची चर्चा आहे. त्यात नाना पटोले यांचं नावही आघाडीवर आहे. मात्र नाना पटोले यांनी स्वतःच आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
