#

Advertisement

Thursday, September 1, 2022, September 01, 2022 WIB
Last Updated 2022-09-01T17:55:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे महापालिकेचं विभाजन होणार? चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

Advertisement

पुणे :  पुणे महापालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे, असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले, त्यांच्या या विधानामुळे पुणे महापालिकेचे भविष्यात दोन भाग होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. 
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर हात घातला. विशेष म्हणजे त्यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. पुण्यात आता 23 नवीन गावं समाविष्ट झाली आहेत. देशातील कुठल्याही महानगर पालिकेपेक्षा पुण्याचे क्षेत्र मोठं झालं आहे. त्यामुळे आता पुणे महानगर पालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय बोलत नाहीय. कारण युनिट जेवढं छोटे होईल तेवढे ते मॅनेज होतं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. जी राज्य लहान आहेत म्हणजे गोवा, तिथला मुख्यमंत्रीला बायकोने सांगितले की मासळी बाजारात जाऊन मासेवल्याला जाऊन भेटतो. कारण तिथे 40 मतदारसंघ 12 मंत्री आहेत. त्यामुळे तिथला मुख्यमंत्री सगळ्यांच्या घरी जाऊन भेटतो. त्यांच्या घरी जाऊन जेवतो. त्यामुळे काही स्मॉल युनिट मॅनेजेबल असतात", असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.