#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T11:02:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महिला प्रवासी आणि महिला टोल कर्मचारी यांच्यात हाणामारी

Advertisement

नाशिक : नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, महिला प्रवासी आणि महिला टोल कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली आहे. 
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुण्याला जात होते.  त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली.  त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असं सांगितलं, त्यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महीलेमध्ये बाचाबाची झाली,काही वेळातच त्याच रूपांतर थेट हाणामारीत झाले.

पिंपळगाव टोलनाका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात.....
पिंपळगाव टोलनाक्यावरील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात, दमदाटी करतात, असा आरोप वाहन चालकांनी केला आहे.  काही दिवसांपूर्वी तर थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचाऱ्यांनी अडवली होती. त्या विषयावर सचिन पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता, तेव्हा ही सबंधित पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.