#

Advertisement

Thursday, September 15, 2022, September 15, 2022 WIB
Last Updated 2022-09-15T11:14:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मी कॉंग्रेसच्या विचारांचाच... पक्ष सोडणार नाही !

Advertisement

कराड : मी कॉंग्रेसच्या विचारांचाच... पक्ष सोडणार नाही. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या माहित नाही. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड मधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले,  काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळे होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी. पक्ष लोकशाही पद्धतीने चालयचा असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे चव्हाण म्हणाले.