Advertisement
मुंबई : गणपतीच्या काळात पावसाने थैमान घातल्याने नागरिकांची गैरसोय झाली. आता, नवरात्रीतही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे. हवामान विभागाकडून पुढच्या चार आठवड्याची पावसाची अपडेट देण्यात आली आहे. संपूर्ण देशात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर पश्चिम व उत्तर मध्य भारतात पुढच्या पुढच्या दोन आठवड्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोब तीसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यानंतर वायव्य भारतात अँटीसायक्लोनिक प्रवाह तयार होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आज (ता. 15) उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
