Advertisement
मुंबई : शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले होते. यानंतर वाद निर्माण झाला. आता याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत. माझ्या वक्तव्याचा राजकीयकरण का केल जात, हे मला कळत नाही, असे म्हणाले. मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले, माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार या देशात आहे. मी काय देशाच्या विरोधात बोलले नाही, महात्मा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भाऊराव पाटील हे आपले देव आहेत. या महापुरुषांनी शिक्षणासाठी खूप काम केले आहे, या लोकांनी आपल्याला शिक्षक दिले आहे. सरस्वतीची आपण पूजन करतो ते काय आपल्याला शिकवले नाही त्यांनी कुठे शाळा काढली. सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे मी सरस्वती ऐवजी यांचं पूजा करा अस म्हणालो. मी कुठेही सरस्वती देवीची फोटो काढा असे म्हणलो नाही. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे.
