Advertisement
मुंबई : 'मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की 'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे'. 'जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे.
